Type Here to Get Search Results !

कोळे येथील विलास देशमुख (सर) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...!

 कोळे येथील विलास देशमुख (सर) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन...!




सांगोला प्रतिनिधी:- 

                     सांगोला तालुक्यातील कोळे येथील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत नेते सांगोला खरेदी - विक्री संघाचे मा.व्हा चेअरमन विलास मारुती देशमुख यांचे दि.३०.०७.२०२४ रोजी सकाळी ७. वाजण्याच्या सुमारास सांगली येथे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८४ वर्ष होते. निधनाची वार्ता समजताच सर्व कोळे गाव हे दुःख सागरात बुडाले.कोळे गाव बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला.

        शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व.आम.भाई गणपतराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू,सर्व व्यक्तींना राजकीय & अराजकीय पटलावर योग्य दिशेने वाटचाल करण्यास लावणारे निर्भिड नेतृत्व, अत्यंत कणखर, परखडपणे आपले विचार व्यक्त करून विचार करण्यास भाग पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे  कोळे गावचे नेते विलास देशमुख सर हे प्रत्येक समाजाच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी होत.आपुलकीने मायेने विचारपूस करणारा नेता म्हणून पंचक्रोशीत त्यांची मोठी ख्याती होती.सांगोला खरेदी - विक्री संघाचे ते जवळपास ३५ वर्ष व्हा.चेअरमन म्हणून त्यांनी योग्यप्रकारे शिस्तबद्ध काम पाहिले व कोळे विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून काम केले असे विश्वासू,अभ्यासू,राजकीय,अराजकीय व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या निधनाने कोळे गावची व संपुर्ण समाजाची कधी ही न भरून येणारी हानी झाली आहे.

         मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी मार्केट येथे कार्यरत असलेले प्रभारी उपअभियंता सतिश देशमुख ,प्रमोद देशमुख,उदय देशमुख यांचे  वडील होते.विलास देशमुख सर यांच्यावर मंगळवारी सायंकाळी ५. वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी डॉ. बाबासाहेब देशमुख,डॉ.अनिकेत देशमुख,दादा बाबर, बाळासाहेब एरंडे, मारुती बनकर आबा , पि.सी. झपके सर सर्व कोळे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांचा तिसरा दिवसाचा मातीचा कार्यक्रम १. ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी आठ वाजता कोळे नजीकच्या स्मशान भूमी येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments