सावे गावचे सुपुत्र रमेश कृष्णा शेळके यांचे दुःखद निधन
सांगोला/प्रतिनिधी - सांगोला तालुक्यातील सावे गावचे सुपुत्र रमेश कृष्णा शेळके यांचे शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता वयाच्या 68 व्या वर्षी सांगली येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी 11.00 वाजता मौजे सावे येथे अंत्यसंस्कार केले जातील.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे रमेश कृष्णा शेळके अशी त्याची पंचक्रोशीत ख्याती होती. त्यांना दि. 24 जुलै रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने सांगोला, पंढरपूर येथील दवाखान्यात दाखल केले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी सांगली येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता शुक्रवार दि. 26 रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त भरत (आण्णा) शेळके यांचे ते मोठे बंधू होते. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि. 27 जुलै रोजी सकाळी 11.00 वाजता मौजे सावे येथे अंत्यसंस्कार केले जातील..

!doctype>
Post a Comment
0 Comments