वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते श्री. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे शनिवारी सांगोला दौऱ्यावर....
सांगोला प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडीचे आ.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी ‘ओबीसी आरक्षण बचाव यात्रा’ 25 जुलै 2024 रोजी चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू केली आहे. ‘ओबीसी आरक्षण बचाव यात्रे’मध्ये महाराष्ट्रातील विविध शहरे आणि गावांमधून ही यात्रा जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही ओबीसी आरक्षण बचाव मोहीम यात्रा सांगोला तालुक्यामध्ये शनिवार दिनांक 27 जुलै 2024 रोजी दुपारी 1.00 वाजता येणार आहे. या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे सांगोला तालुकाध्यक्ष विनोद(भैय्या) उबाळे यांनी दिली.
इतर मागास जाती (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण वाचवणे; एससी, एसटी आणि ओबीसींसाठी पदोन्नतीमध्ये आरक्षण; एससी/एसटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट करणे; ओबीसी विद्यार्थ्यांना समान शिष्यवृत्तीचा विस्तार; 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करणे, यांसह अनेक मुद्द्यांवर या यात्रेत भर देण्यात येणार आहे.
तरी या ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही सांगोला तहसील कार्यालय, सांगोला, जि.सोलापूर येथे दाखल होणार आहे. या यात्रेमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या ‘ओबीसी आरक्षण बचाव यात्रे’ मध्ये सांगोला तालुक्यातील ओबीसी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह बहुजन बांधव, नागरीक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष विनोद(भैय्या) उबाळे यांनी केले आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments