सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरु,आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर
सांगली प्रतिनिधी - आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर गेल्यानंतर सांगलीच्या सूर्यवंशी प्लाॅटमध्ये पुराचे पाणी दाखल झाले. याठिकाणच्या १० कुटुंबांचे बुधवारी स्थलांतर करण्यात आले. पाणीपातळीत वाढ झाली तर परिसरातील आणखी काही कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये मध्यरात्री पाणी दाखल झाले. येथील आठ घरांना पाण्याने वेढले. त्यामुळे महापालिकेच्या सुचनेनुसार काही कुटुंबांनी नातेवाईकांकडे तर काहींनी महापालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने सूर्यवंशी प्लॉटमधील सर्व नागरिकांसह इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, शिवमंदिर परिसर, मगरमच्छ कॉलनीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घरातील साहित्य सूरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
!doctype>
Post a Comment
0 Comments