सांगली येथे संविधान परिषद उत्साहात संपन्न
कुंभार हॉल कोल्हापूर रोड सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा नदाफ हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ललित बाबर बोलत होते. ते पुढे म्हणाले, संविधानाने सर्वसामान्य माणसांना माणूस म्हणून जगण्यात अधिकार दिला. आज महिलांना मिळणारे सगळे लाभ हे संविधानाने दिलेलेच आहेत. तरीही संविधानाविषयी म्हणावी इतकी माहिती व जाणीव सर्वसामान्यांना नसल्याने संविधान जागृतीची गरज निर्माण झाली आहे. तर सुरेखा शेख यांनी महिलांच्या न्यायहत्ताकरिता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. चंद्रकांत बाबर यांनी संविधानाने दिलेली मानवतावादी मूल्ये जतन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिल्याचे मत व्यक्त केले. तर अध्यक्ष स्थानावरून बोलताना बाबा नदाफ यांनी मानवमुक्तीसाठी व मानवाधिकार जतन करण्यासाठी संविधान गरजेचे असल्याचे प्रतिपादित केले. यावेळी सविता कोळी यांनी स्त्रीमुक्तीची कविता सादर केली. विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.अश्विनी कोळी ह्यानी संविधान उद्देशिका चे वाचन केले व्हिडिओ फिल्म दाखवुन गटचर्चा घडवून आणली एकल महिलांचा ठराव मंजूर करण्यात आला पथनाट्य सादर करण्यात आले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक संयोजक शबाना शेख यांनी केले तर सूत्रसंचालन कविता लोहार यांनी केले. शिल्पा कोलप आभार यांनी मानले.

!doctype>
Post a Comment
0 Comments