*घोसरवाड परीसरात अवैध मटका व्यवसाय जोमात* *जनतेतून तीव्र नाराजी*
महाराष्ट्र व कर्नाटक या सीमेवर असलेल्या या भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध मटका व्यवसाय फोफावला आहे सीमाभागाचा फायदा हे व्यवसाय करणारे घेत आहेत पोलिसांचा यांवर वचक आहे की नाही असा सवाल जनतेतुन होत आहे.
सध्या महागाई गगनाला भिडली आहे सर्वसामान्य जनतेला आपल व आपल्या कुटुंबाच या महागाईच्या दिवसात जीवन जगणं मुश्कील झाले आहे या व्यवसायाच्या नादी लागल्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत तर काहींचे होण्याच्या मार्गावर आहेत त्या कुटुंबाने कोणाकडे पाहावे या व्यवसायामुळे सर्व सामान्य जनतेच जगणं मुश्कील झाले आहे.
हा व्यवसाय करणारे मात्र निगरगट्ट झाले आहेत त्यांना सर्वसामान्य जनतेच काय असा सवाल उपस्थित होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा व्यवसाय फोफावला आहे यावर अंकुश आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.


!doctype>
Post a Comment
0 Comments