व्यवसाय कर संबंधित कोळे येथे सर्व व्यापारी,व्यवसायिक बंधूंची विचार-विनिमय बैठक.
कोळे प्रतिनिधी:- कोळे येथे ग्रामपंचायत कार्यालय कडून विविध प्रकारच्या व्यवसाय करा निमित्त आकारणी अनुषंगाने सर्व बाबींवर विचार-विनिमय बैठक लक्ष्मी मंदिर कोळे या ठिकाणी पार पडली. या वेळी बैठकीमध्ये विविध प्रकारच्या चर्चा, लोकांच्या जनभावना, प्रतिक्रिया, प्रश्न विविध प्रकारच्या कराबद्दल माहिती व त्यावरील उपाययोजना या बदल महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये व्यवसाय कर हा सर्वसामान्य पद्धतीने सर्वांना समान एकच व्यवसाय कर आकारण्यात यावा.अशी मागणी कोळे व्यावसायीक जनतेमधून करण्यात आली. यावेळी हॉटेल व्यवसाय, ज्वेलर्स व्यवसाय, किराणा व्यवसाय, पानपट्टी व्यवसाय, किरकोळ विक्रेते, कापड दुकानदार, स्टेशनरी व्यावसायीक आदी सर्व व्यापार, उद्योगधंदे करणारे लोक व कोळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

!doctype>
Post a Comment
0 Comments