* फिनिक्स प्री प्रायमरी स्कूल नाझरे येथे विद्यार्थी दिंडीचा सोहळा उत्साहात संपन्न*
सांगोला (प्रतिनिधी): आषाढी एकादशीच्या निमित्ताने फिनिक्स प्री प्रायमरी स्कूल नाझरे येथे विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विठुरायाच्या गजरात करण्यात आली. कु.जय नितीन बंडगर याने विठ्ठलाची भूमिका,रित्विका सागर आदाटे हिने रुक्मिणीची तसेच कु. कृष्णा सचिन शिंदे या विद्यार्थ्याने तुकारामाची भूमिका पार पाडली.सर्व मुलांनी माऊली माऊली या गाण्यावर डान्स करून विठुरायाचा जयजयकार केला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. विद्यार्थिनी व माता-पालकांनी फुगडीचा ताल धरून कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थाचालक सौ.ऐश्वर्या सोनवणे मॅडम, फिनिक्स प्री प्रायमरी स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. सोनाली सरगर मॅडम, सहशिक्षिका सौ.काजल आलदर मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

!doctype>
Post a Comment
0 Comments