Type Here to Get Search Results !

एका संबंधित प्रकरणामध्ये लाच स्वीकारताना खाजगी इसमासह पोलिस शिपाई अँटी करप्शन च्या जाळ्यात अडकला...!

 एका संबंधित प्रकरणामध्ये लाच स्वीकारताना खाजगी इसमासह  पोलिस शिपाई अँटी करप्शन च्या जाळ्यात अडकला...!


सांगोला प्रतिनिधी -दाखल गुन्ह्यात कलामामध्ये वाढ न करण्यासाठीं  व अटक न करता जामिनावर सोडण्यासाठी ४५ हजार रुपये लाच मागून तडजोडी अंती २५ हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस शिपाई सह खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाने ताब्यात घेतली आहे. पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ माने, ब.नं. २०३६ नेमणुक सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण व खाजगी इसम असे गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. यातील तक्रारदार यांचे व त्यांचे मुलांचे विरुध्द सांगोला पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या सदर गुन्ह्यांमध्ये कलम वाढ न करुन व अटक न करता जामीनवर सोडण्यासाठी व गुन्हयाचे तपासामध्ये मदत करण्यासाठी पो.कॉ./ सोमनाथ माने, नेमणुक सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण व खाजगी इसम यांनी प्रथम ४५००० रुपये लाचेची मागणी केली होती अशी तक्रार प्राप्त झाली.

 २२/०७/२०२४ रोजी पडताळणी कारवाईमध्ये प्रथम ३००००, रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती २५००० रुपये लाच रक्कम पो.कॉ.सोमनाथ माने यांनी स्वीकारण्याचे तयार दर्शवून सदरची २५००० रूपये लाचेची रक्कम खाजगी इसम यांच्या हस्ते स्वीकारले असताना दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक पुणे चे पोलीस अधिक्षक श्री.अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूरचे पोलीस उपअधीक्षक श्री.गणेश कुंभार,पोलीस अंमलदार सपोफौ कोळी, पो.कॉ.सोनवणे,पो.कॉ.किणगी, पो.काँ.गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments