जि.प.प्रा.केंद्र शाळा महुद ब्रु.शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंगद जाधव तर उपाध्यक्षपदी धीरज जाधव यांची बिनविरोध निवड.
माणदेश मैदान न्युज नेटवर्क -
सांगोला तालुक्यातील मौजे महुद ब्रु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया शांततेत व आनंदात बिनविरोध पार पडली. दिनांक 23 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित पालकसभेत ही निवड करण्यात आली.
या बैठकीत अध्यक्षपदी अंगद भिमराव जाधव व उपाध्यक्षपदी धीरज माणिकराव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेदरम्यान पालक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच सदस्य म्हणून जयंत बाबर, मंगेश बाजारे, रामचंद्र आलदर, दादासाहेब चव्हाण, हिना तांबोळी, दीपाली चव्हाण,अर्चना जाधव, प्रियंका कांबळे, रुपाली सरतापे, शबाना जमादार , बाळासाहेब नागणे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदर सभेस निरीक्षक म्हणून बाळासाहेब जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक मध्ये मुख्याध्यापक सिद्धेश्वर पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे महत्त्व पटवून देवून समिती पुनर्गठनाबाबत करण्याबाबत सर्व शासन निर्णयाची माहिती उपस्थित सर्व पालकांना सांगितली. सदरच्या निवडी ह्या अत्यंत खेळीमिरीच्या आनंदाच्या वातावरणात पार पडल्या. या पालक बैठकीस बहुसंख्य गावातील पालक शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.

!doctype>
Post a Comment
0 Comments