Type Here to Get Search Results !

*माणगाव परिषद १०६ व्या वर्षपूर्ती निमित्त “सलाम संविधान महाजल्लोष” कार्यक्रम जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न.*

 *माणगाव परिषद १०६ व्या वर्षपूर्ती निमित्त “सलाम संविधान महाजल्लोष” कार्यक्रम जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न.* 

माणगाव, ता. हातकणंगले :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, कोल्हापूर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव परिषद १०६ व्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला “सलाम संविधान महाजल्लोष” हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी (दि. २२ मार्च २०२६) रोजी सन्मानभूमी माणगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


या कार्यक्रमास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे दादा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच आमदार अशोकराव माने, माजी आमदार राजीव आवळे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, अनिल कांबळे, सचिन परब, किरण चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे रोहित पिसाळ यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.


कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक-संगीतकार कबीर नाईकनवरे आणि सुप्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी “शिंदेशाहीची भीमशाही गाणी” सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संविधान, समता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या भीमगीतांनी सन्मानभूमी माणगाव येथे प्रबोधनात्मक वातावरण निर्माण झाले.


यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाजाच्या हक्कांसाठी रस्त्यावरची लढाई ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण ‘जय भीम’ म्हटल्यानंतर ‘जय संविधान’ असेही अभिमानाने म्हटले पाहिजे. संविधानाच्या विचारांचा प्रसार समाजात होणे ही आजच्या काळाची गरज आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले.


माणगाव परिषदेच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने भीमप्रेमी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमामुळे संविधानाबद्दल जनजागृती होत सामाजिक एकजुटीचा संदेश समाजात पोहोचल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments