सांगोला नगरपालिका निवडणूकित जय- विरु यांच्या दोस्तीत लागली शाब्दिक कुस्ती.!
णदेश मैदान न्यूज संपादक बबन चव्हाण /एकेकाळी सांगोला तालुकात असो किंवा जिल्हात असो की संपूर्ण राज्यामध्ये जय वीरूची यांची जोडी म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणारे बापू आणि आबा यांच्या मैत्रीमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून मिठाचा खडा पडला असून ही दोस्ती तुटायची नाय असे म्हणणारे हे दोन्ही दिग्गज नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आहेत, त्यातच नुकते आमच्या प्रतिनिधीशी बोलत असताना माजी आमदार दीपकआबा यांनी बापूंना माझ्या मित्रा जरा सबुरीने घे असा उपरोधिक टोला लावत सल्ला दिला आहे . या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या जोडीने सांगोला तालुक्यामध्ये विकासरत्न अविरतपणे ओढत मोठ्या प्रमाणात विकास गंगा तालुक्यामध्ये आणली आणि त्याच शाश्वत विकासावर विश्वास ठेवून असणारे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते यांना मात्र मोठी खात्री होती की ही जय वीरुची जोडी आणि मैत्री अशीच आबादीत राहिलेली पुढील सर्व निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल.मात्र गतवर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांसमोर उभे राहिले होते त्यातच काय बापूंच्या पराभवाचे खापर हार देखील आबांवर फोडत असल्याचे राजकीय वर्तुळातून ऐकायला मिळत आहे.
तथापि गेल्या अनेक दशकांपासून समाजकारण आणि राजकारणामध्ये अविरतपणे काम करणारे आणि नेहमी उपलब्ध असणारे नेते म्हणून दीपकआबांची ओळख सर्वत्र परिचित आहे त्यामुळे त्यांना आमदारकी लढविणे ही आकांक्षा काही चुकीची नाही मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्व राज्यसह सांगोला तालुक्याचे समीकरण बिघडल्याने या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढली खरी मात्र यामध्ये दोघांनाही पराभवाचा सामना करावा लागला आणि दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या म्हणी प्रमाणे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचा विजय झाला ही जरी वस्तुस्थिती असली तरी सुरू असलेली सांगोला नगरपालिकेची निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतरही निवडणुकांमध्ये बापू आबा या जय वीरूची जोडी एकत्र दिसेल अशी अशा अनेकांनी व्यक्त केली होती मात्र तसेच झाले नसून याउलट हे दोन्ही नेतेमंडळी एकमेकांवर जहरी टीका करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .सांगोला नगरपालिकेचे मैदान गाजले असून यामध्ये विजय कोणाचा होईल हे तर मायबाप जनता ठरवणार आहे परंतु बापू आणि आबा यांच्यामधील टीकाणचे प्रमाण पाहता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये या निवडणुकीमध्ये प्रचंड उलथापालट व राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे अंतिम फैसला ही सांगोला शहरातील सुज्ञ मतदार बंधू-भगिनी करतील आणि सोयीचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना त्यांची योग्य जागा दाखवतील हे मात्र नक्की.

!doctype>
Post a Comment
0 Comments