*वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांचा सत्कार*
वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली झाल्याने त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 2012 मध्ये पीएसआय म्हणून पोलीस सेवेत रुजू झालेले राहुल डोंगरे यांनी रायगड येथे सेवा बजावली आहे. त्यानंतर पदोन्नतीवर त्यांची नागपूर शहर गुन्हे शाखेत बदली झाली. 2023 पासून सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी कामगिरी केली आहे. आता त्यांची वळसंग पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. पत्रकार सुरक्षा समिती वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांची सदिच्छा भेट घेऊन शाल व पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार शहर सचिव अरुण सिड गिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी उपस्थित होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे म्हणाले की ग्रामीण आणि शहर हद्द असलेल्या वळसंग पोलीस स्टेशनची कामगिरी आतापर्यंत महत्त्वाची राहिली आहे. शांततापूर्ण वातावरण व भागात सुव्यवस्था ठेवण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगले काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

!doctype>
Post a Comment
0 Comments