विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला सीसीटीव्ही बसविले; पंकजकुमार काटे यांच्या पाठपुराव्याला यश.!
कोळे पंचक्रोशीतील नागरिकांनी पंकज काटे यांचे मानले आभार
कोळे माणदेश मैदान /
कोळा (ता. सांगोला) :सांगोला तालुक्यातील दिनदलित, वंचित,उपेक्षित घटकाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देणारे महूद गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा एन.डी.एम.जे. जिल्हाध्यक्ष पंकज काटे यांनी कोळा येथील आंबेडकरी कार्यकर्ते व समाज समाज बांधवांची मागणी लक्षात घेऊन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार स्मारक परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सातत्याने होत असलेल्या या मागणीचा विचार करून एन.डी.एम.जे. संघटनेतर्फे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष पंकजकुमार काटे यांच्या पुढाकाराने विषयावर संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने अखेर सदर मागणी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आली.
दहा दिवसात स्मारक परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण झाले. यामुळे स्मारक परिसर अधिक सुरक्षित झाला असून, स्थानिक नागरिक व समाज बांधवांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे व समाज बांधवांचे जिल्हाध्यक्ष पंकजकुमार काटे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध:- पंकजकुमार काटे.
समाज बांधवांनी दाखवलेला विश्वास हीच आमची प्रेरणा आहे त्यांच्या सहकार्याने हे कार्य शक्य झाले सोबतच आगामी काळात देखील समाज बांधवांच्या अडीअडचणीसाठी प्रशासकीय दरबारी तसेच रस्त्यावरची लढाई करायला देखील मागेपुढे पाहणार नाही असा इशारा यावेळी. एनडीएमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकजकुमार काटे यांनी दिला.

!doctype>
Post a Comment
0 Comments