Type Here to Get Search Results !

सांगोला तालुक्यातील ग्रीन झोन परिसर वाचवण्यासाठी वाहिद आतार यांचे सोलापूर येथे आमरण उपोषण सुरू ; न्यायाच्या लढ्यात एकटा योद्धा..!

 सांगोला तालुक्यातील ग्रीन झोन परिसर वाचवण्यासाठी वाहिद आतार यांचे सोलापूर येथे आमरण उपोषण सुरू ; न्यायाच्या लढ्यात एकटा योद्धा..!

सोलापूर प्रतिनिधि:- 

“ मी न्याय मागतो… प्रशासनाने उत्तर द्यावे..!”  

         या ठाम शब्दांनी सांगोला तालुक्यातील कोळे येथील श्री. वाहिद अल्लाउद्दिन आतार यांनी पूनम गेट, सोलापूर येथे 15 ऑक्टोबर 2025 पासून आमरण उपोषणास सुरुवात केली.


या आमरण उपोषणास सांगोला तालुक्यातील पत्रकार सतीश सावंत व चंद्रकांत ऐवळे या दोन वाघांचा जाहीर पाठिंबा.

          महुद रोड परिसरातील ग्रीन झोनमधील गट क्र. 460 ते 466 या जमिनींवर बेकायदेशीर प्लॉटिंग आणि मुरुम उत्खनन सुरू असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात जबाबदार अधिकारी व दलालांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या संपत्तीची ED व CBI मार्फत चौकशी करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.“ही लढाई केवळ माझी नाही, ही माणदेशातील पर्यावरण, प्रामाणिक प्रशासन आणि भविष्यातील पिढ्यांसाठीचा हा मोठा संघर्ष आहे. सांगोला तालुक्यातील ग्रीन झोन परीसर वाचवण्यासाठी जीव पणाला लावला तरी चालेल पण विधिलिखित सत्य बाहेर येणारच.” जनतेत त्यांच्या या आमरण आंदोलनाबद्दल तीव्र सहानुभूती आणि पाठिंबा उमटत असून, प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

       योग्य न्यायासाठी उभा असलेला एक माणूस  — आणि संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था ही मौन अवस्थेत का ? असा सवाल युवा पत्रकार वाहिद आतार यांनी प्रशासनास विचारला आहे.

Post a Comment

0 Comments