Type Here to Get Search Results !

सांगोला तालुक्यातील महुद रोडजवळ अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; राजकीय आशीर्वाद की व्यवस्थेचा खेळ..?

सांगोला तालुक्यातील महुद रोडजवळ अवैध मुरूम उत्खननचा राजरोसपणे धुमाकूळ ; राजकीय आशीर्वाद की व्यवस्थेचा खेळ..?

भाग नंबर :- 2

माणदेश मैदान न्युज:- 

{मुख्य संपादक / बबन चव्हाण}

        सांगोला तालुक्यातील जवळच असलेल्या महुद रोड परिसरात अवैध मुरूम उत्खननाचा दिवसरात्र धुमाकूळ सुरू असून, ट्रॅक्टर व जे.सी.बी डंपरद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या महसूल विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बेफिकीरपणे मनमानी पद्धतीने मुरूम वाहून नेली जात असल्याचे समोर येत आहे.या अवैध मुरूम उत्खननामुळे जमिनींचे भरपूर प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणीय धोका निर्माण झाला आहे.

        स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतरही महसूल विभाग, पोलीस व संबंधित शासकीय यंत्रणा मात्र कारवाईस टाळाटाळ करत असल्याने "नक्की राजकीय आशीर्वाद कोणाचा?" असा सर्रास प्रश्न उपस्थित होत आहे.

         त्यामुळे स्थानिक प्रशासन हे  झोपेचे सोंग घेऊन झोपले असल्याचे निदर्शनात येत आहे आणि या "स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेवर व स्थानिक राजकीय दबावतंत्र" ही असल्याची जोरदार चर्चा संपूर्ण सांगोला तालुक्यात रंगू लागली आहे.


लवकरचं वाचा भाग नंबर :-3

माणदेश मैदान न्युज मध्ये.

"सांगोल्यातील महुद रोड परिसरात अवैध बेकायदेशीर मुरूम उत्खनना मागे नेमकी कोणाची छत्रछाया ?"



Post a Comment

0 Comments