सांगोला नगरपरिषद व महाराष्ट्र राज्य चित्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२५' चे बक्षीस वितरण, 'श्रीगणेशा आरोग्याचा महिला आरोग्य अभियान-२०२५' चे आयोजन तसेच महाराष्ट्रातील प्रतिष्ठित चित्रकारांना 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान समारंभ संपन्न
सांगोला नगरपरिषद व महाराष्ट्र राज्य चित्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२५' चे बक्षीस वितरण, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांचे सहकार्याने 'श्रीगणेशा आरोग्याचा महिला आरोग्य अभियान-२०२५' चे आयोजन तसेच महाराष्ट्रातील प्रतिष्ठित चित्रकारांना 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान समारंभ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रतनबाई(बाईसाहेब) गणपतराव देशमुख, सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख, डाॅ.सौ.आस्थाताई अनिकेत देशमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. अविनाश खांडेकर, सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी, महाराष्ट्र राज्य चित्रकार संघटनेचे अध्यक्ष श्री. विनोद बाबर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित चित्रकार कलामहर्षी बाबूराव पेंटर, चित्रकार कलायोगी जी. कांबळे, चित्रकार अण्णासाहेब चौगुले, चित्रकार पी. सरदार, चित्रकार के.आर. कुंभार, चित्रकार यल्ला-दासी, चित्रकार कल्याण शेटे व इतर १५ चित्रकारांना जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमठिकाणी या प्रतिष्ठित चित्रकारांनी रेखाटलेली चित्रांची चित्रफीत प्रेक्षकांना पाहता आली. यावेळी सांगोला नगरपरिषद व महाराष्ट्र राज्य चित्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२५' चे बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमधील प्रथम विजेते- सौ. रेश्मा प्रशांत दिवटे, द्वितीय विजेते- शोभा प्रकाश टकले, तृतीय विजेते- मेघा काकासो भागवत व उत्तेजनार्थ विजेते यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सदर वेळी बोलताना डॉ. अनिकेत देशमुख यांनी नगरपरिषदेने राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व जीवनगौरव पुरस्कार प्राप्त चित्रकार यांनी कलेसाठी आपले जीवन वेचले असून प्रत्येकानी जीवनामध्ये कोणतीतरी कला आत्मसात करावी, असे प्रतिपादन केले. यावेळेस मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांचे सहकार्याने 'श्रीगणेशा आरोग्याचा महिला आरोग्य अभियान-२०२५' चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध रक्त तपासण्या, ईसीजी तपासणी इ. वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या. सांगोला शहरातील महिलांनी या वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमास सांगोला नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी, सांगोला शहरातील महिला वर्ग व कलारसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.सांगोला नगरपरिषद व महाराष्ट्र राज्य चित्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'गौरी-गणपती सजावट स्पर्धा २०२५' चे बक्षीस वितरण, 'श्रीगणेशा आरोग्याचा महिला आरोग्य अभियान-२०२५' चे आयोजन तसेच महाराष्ट्रातील प्रतिष्ठित चित्रकारांना 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान समारंभ संपन्न
September 10, 2025
0
.jpg)
!doctype>
Post a Comment
0 Comments