Type Here to Get Search Results !

सांगोल्यातील महुद रोड परिसरामध्ये चाललेल्या अवैधरित्या बेकायदेशीर मुरूम उत्खननामागे नेमकी कोणत्या मोठ्या व्यक्तींची छत्रछाया?, गौण खनिज महसूल विभाग मूग गिळून गप्प का?

सांगोल्यातील महुद रोड परिसरामध्ये चाललेल्या अवैधरित्या बेकायदेशीर मुरूम उत्खननामागे नेमकी कोणत्या मोठ्या व्यक्तींची छत्रछाया?, गौण खनिज महसूल विभाग मूग गिळून गप्प का?


माणदेश मैदान न्युज ;- 

(कार्यकारी संपादक)

        सांगोला तालुक्यातील महुद रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मुरूम उत्खनन सुरू असून महाराष्ट्र शासन महसुल विभागाला कोट्यवधींचे आर्थिक महसूल कर बुडून नुकसान होत आहे.दिवसाढवळ्या डंपर,ट्रॅक्टर,जेसीबी व अन्य वाहनाद्वारे मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ सुरू असताना स्थानिक महसूल अधिकारी व पोलीस यंत्रणा स्पष्टपणे डोळेझाक करत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.रात्र-दिवस बेमाप मुरूम काढला जात असून परिसरातील शेती, रस्ते व पर्यावरण धोक्यात आले आहे.सांगोला तालुक्यातील गौण खनिज महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी नसतानाही खुलेआम बेकादेशिरपणाने मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

       प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने लोकांचा रोष वाढत आहे.सांगोला महसूल गौण खनिज विभाग, तसेच पोलीस प्रशासन यांच्या मिलीभगतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुरूमाचे उत्खनन होऊ शकत नाही, असा संशय सांगोला तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.


माणदेश मैदान न्युज..💥

भाग नंबर 4 लवकरचं...

पर्यावरणाचा ऱ्हास, सांगोला गौण खनिज महसुल विभागाचा तोटा; तरीही मुरूम राजरोसपणे उत्खनन सुरूच...!

Post a Comment

0 Comments