Type Here to Get Search Results !

No title

 सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग यांची सांगोला येथील सोनंद जुगार अड्ड्‌यावर धडाकेबाज कारवाई २ कोटी ६० लाखाचा मुद्दे‌माल जप्त.

माणदेश मैदान न्युज :- 
(कार्यकारी संपादक / वाहिद आतार)

          सांगोला तालुक्यातील मौजे सोनंद येथील हॉटेल मटन भाकरी च्या सिमेंट पत्राचे खोलीत सचिन साहेबराव काशिद रा.सोनंद ता.सांगोला व शंभुलिंग प्रकाश तेरदाळ रा.आथणी जि. बेळगाव हे विनापरवाना जुगार क्लब चालवित आहेत अशी गोपनीय बातमी मिळाली असून गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई राबविण्यात आली. पोलिसांनी छापा टाकताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर रोकड, मोबाईल फोन,वाहनं,देशी विदेशी दारूचा साठा अन्य साहित्य जप्त करण्यात आले.या अचानक टाकलेल्या धाडीत ५० जणावर कारवाई करण्यात आली.

अवैध जुगार अड्ड्यावर जप्त केलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे...

१.रोख रक्कम - १६,०९,४८०,६२ ₹
२.मोबाईल १३,९१,१००, २६ ₹
३.चारचाकी वाहने  २ कोटी ९ लाख, 
४.६१ दुचाकी २९,६०,००० ₹
५.देशी-विदेशी दारू ११,१६५ ₹
मुद्दे‌माल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याबाबत सांगोला पोलीस ठाणेस वरील ५० इसमांवर महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ४,५ व महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
 
            सदरची कामगीरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सो सोलापूर ग्रामीण, अपर पोलीस अधिकारी प्रितम यावलकर, मा. सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत गडले, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर सिद्धाधाम स.पो.नि / विभावरी रेळेकर, पोसई/भारत भोसले, पोसई /अनिल पाटील, श्रेणी पोसई/दय तोंडले, पोह/१८६ निलेश रोंगे, पोह/८५ कामतकर, पो.हे.कॉ/१४१५, मंगेश/१४१५ उबाळे, पो.ह/१६९६ अरुण कोळवले, पो.ह/१२६ सातव, म
पो.हे.कॉ / २८१ शितल राउत, पो.हे.का /१८८६ शितल राउत, पो.ना/१५२७ संतोष गायकवाड, पो.ना/१३८३ सिताराम सदस्य, पो.ना/७२३, पो.ना/१०१/ढोणे, पो.ना/१०१३ गुटाळ, पो.कॉ/२११६ गवळी, पो.कॉ/१४२३ राहुल लोंढे, पो.कॉ/७९६ आवटे, पो.कॉ/९७१ जाधव, पो.कॉ/१०२२ मदने, पो.कॉ/२११० हुलजंती, त्यांनी पार पाडलेली आहे.सदरच्या या धडाकेबाज कारवाई चे स्थानिक स्तरावर कौतुक होत असून, अवैध धंद्यांवर कडक कारवाईची मागणी जनतेकडून होत आहे.

 

Post a Comment

0 Comments