माहिती अधिकार अर्ज करूनही माहिती मिळत नाही ; सांगोला सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात..!
माणदेश मैदान न्युज
[कार्यकारी संपादक :- वाहिद आतार.]
सांगोला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सामजिक कार्यकर्ता, निर्भिड पत्रकार,पत्रकार सुरक्षा समितीचे सांगोला कार्याध्यक्ष वाहिद आतार यांनी दि.१२.०६.२०२५ रोजी दाखल केलेल्या माहिती अधिकार (RTI) अर्जांवर आजवर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.कायद्यानुसार ३० दिवसांत माहिती देणे बंधनकारक असतानाही, अर्जदारांना उत्तर न देणे म्हणजेच पारदर्शकतेला फाटा देण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे.
माहिती न दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, “RTI कायद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का ?” असा थेट सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments