अनकढाळ टोलनाक्यावरील वाहतूक पोलिसांकडून "आर्थिक" लुटमार खुलेआम सुरू ; नक्की अभय कोणाचे ?.
अनकढाळ टोल नाक्यावरील वाहतूक पोलिसांचा पंचनामा भाग :-१
(मुख्य संपादक :-बबन चव्हाण)
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार सांगोला येथील मार्केट यार्ड परिसरामध्ये भरत असून या ठिकाणी महाराष्ट्र,कर्नाटक या राज्यातून व विविध जिल्ह्यातून शेतकरी वर्ग व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात जनावरे खरेदी-विक्री करण्यासाठी सांगोल्यातील बाजारासाठी येत असून वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराचां त्रास सतत होत आहे.अनकढाळ येथील टोलनाक्यावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांकडून खुलेआम "आर्थिक लुटमार" सुरू असल्याच्या तक्रारींनी उघड उघड जनतेच्या संतापाला तोंड फुटले आहे.कोणत्याही प्रकारचे स्पष्ट नियम न सांगता, वाहनचालकांना अडवून करून कायद्याचा धाक व नियम दाखवून मनमानी पद्धतीने आर्थिक रक्कम उकळण्याचे प्रकार सर्रास पाहायला मिळत आहेत.
स्थानिक वाहनधारकांच्या मते, हे सर्व "एक संगठित रॅकेट"प्रमाणे चालत असून, त्यामागे वरपासून खालपर्यंत अभय मिळत असल्याची शंका व्यक्त होत आहे."टोल भरूनही पुन्हा पैसे देण्याची वेळ येते, मग हे कोणत्या अधिकारात आहे ?" असा सवाल अनेक वाहनचालक विचारत आहेत.
वाहतूक पोलीस कोणत्या अधिकाराने रक्कम वसूल करत आहेत ? आणि ही वसुली कुणाच्या आदेशाने केली जात आहे? – हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
"प्रत्येक रविवारी सांगोला तालुक्यात जनावरांचा आठवडा बाजार असून अनकढाळ टोल नाक्यावरील वाहतूक पोलीस हे गाड्या अडवून प्रत्येकी १०० -२०० रुपये उकळले जातात.ना पावती, ना कारण," असं एका स्थानिक प्रवासी वाहन चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.टोल वसूल करूनही पुन्हा वाहतूक पोलिसांकडून पैसे उकळले जाणं, ही दुहेरी लुट असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. विशेषतः रात्रंदिवस हे प्रकार जास्त घडत असल्याचंही निदर्शनास आलं आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments