Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

 पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

सांगोला (प्रतिनिधी )पत्रकार सुरक्षा समितीची सांगोला येथे बैठक पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी दैनिक तुफान क्रांतीचे संपादक तथा पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर होते या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, पत्रकारांसाठी विमा योजना, घरकुल योजना, आरोग्य योजना, राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बस मधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनांना टोल मधून सूट ज्या पत्रकारावर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा पत्रकारांची स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी ही मारहाण इत्यादी विषयावर पत्रकार सुरक्षा समिती गेली आठ वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार  करून पत्रकारांचे प्रश्न सोडवत आहे.

 पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुक्याचे नूतन कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली.

 पत्रकार सुरक्षा समिती सांगोला तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत ऐवळे, कार्याध्यक्ष वाहिद आत्तार, सचिव बबन चव्हाण, तालुका सहकार्याध्यक्ष शुभम ऐवळे, तालुका उपाध्यक्ष शशिकांत हातेकर तर सांगोला शहर अध्यक्षपदी राजू बाबर,शहर सचिव जयराम रणदिवे, कार्याध्यक्ष विकास बाबर, उपाध्यक्ष कैलास हिप्परकर यांची निवड पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मिर्झा गालिब मुजावर यांनी जाहीर केली आहे.

 *बातमी लावण्यावरून गुन्हे दाखल होणे गंभीर बाब* रस्त्यावर उतरणार 

 सांगोला तालुक्यात बातमी लावण्यावरून काही पत्रकारावर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली असून सदरची बाब अतिशय गंभीर असून पत्रकारितेचा गळा घोटणारी आहे. बातमी लावण्यावरून जर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी असा सवाल पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी प्रशासनाला विचारला असून यापुढे सांगोला तालुक्यातील पत्रकारांवर बातमी लावण्यावरून खोटे गुन्हे दाखल होत असतील तर आपण गप्प बसणार नाही या संदर्भात लवकरच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी या बैठकीत दिला आहे.

Post a Comment

0 Comments