कोळे येथे बेंदूर सण उत्साहात साजरा..
कोळे प्रतिनिधी :-बेंदूर (बैलपोळा) हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा कृषी सण आहे. हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना विश्रांती दिली जाते. सांगोला तालुक्यातील कोळे येथे फटाक्याची आतषबाजी,सुर-सनई,हलगी च्या तालावर वाजत गाजत बैलांची पूजा करून, बैलांना सजवून त्यांची कोळे येथील प्रमुख चौकातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी कोळेसह इतर ग्रामीण भागातील लोक बेंदूर सणानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी राजाचा मेहनतीचा साथीदार म्हणून ही बैलास ओळखले जाते.बेंदूर हा शेतकऱ्यांसाठी वर्षातील अतिशय महत्वाचा दिवस असतो.बैलांना वर्षभर केलेल्या कष्टांसाठी धन्यवाद देण्यासाठी हा सण साजरा केला जातो.महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

!doctype>
Post a Comment
0 Comments