Type Here to Get Search Results !

सांगोला तालुक्यातील रेडियम व डिजिटल प्रिंटिंग व्यावसायिकांची शासनाने लागू केलेल्या हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बाबत महत्त्वपुर्ण विचार - विनिमय बैठक संपन्न.

 सांगोला तालुक्यातील रेडियम व डिजिटल प्रिंटिंग व्यावसायिकांची शासनाने लागू केलेल्या हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बाबत महत्त्वपुर्ण विचार - विनिमय बैठक संपन्न.

माणदेश मैदान न्युज (बबन चव्हाण)

         दि.०७ मार्च २०२५ रोजी सांगोला तालुका रेडियम व डिजीटल प्रिंटींग व्यवसायिकांची राजमाता जिजाऊ ऊद्यानात सांगोला येथे मिटींग पार पडली,त्यामध्ये शासनाने सध्या सर्व प्रकारच्या गाड्यांकरिता हाय सिक्युरिटी नंबरप्लेट लागू केल्या आहेत, त्यासंबंधित सर्व व्यवसायिकांनी त्रिव नाराजी व्यक्त केली सरकारच्या या निर्णयामुळे हजारो कुटूंबावर ऊपासमारीची वेळ येणार आहे.छोट्या व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी एकप्रकारे त्यांचे व्यवसायचं काढुन घेतले आहेत त्यामुळ बेरोजगारीत भर पडणार आहे.

          मायबाप सरकारला विनंती आपण स्थानिकांची रोजीरोटी हिरावून न घेता त्या व्यवसायिकांना काही नियम व अटी लागू करून त्यांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बनविण्यास मंजुरी द्यावी.त्यामुळे वाहनधारकांना होणारा त्रास कमी होईल.हजारो कुटूंब ऊघड्यावर पडण्यापासून वंचित राहतील.स्थानिकांना बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळेल.अशा प्रकारची भावना सरकारकडे पोहचविण्याकरिता महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.या सदरच्या बैठकीसाठी संतोष जाधव,श्रीकांत बंडगर, प्रकाश बनकर,अमीर मुजावर, गौरव करडे, ज्ञानेश्वर भजनावळे,समाधान सावंत, आनंद दीक्षित,माही भंडारे, विलास जाधव,प्रताप भजनावळे,योगेश गुळमिरे, एम नदाफ,सागर गायकवाड, बाळासाहेब सरगर,लव्हू सरगर,सोमनाथ बनसोडे,स्नेहल लोखंडे, नवाज खतीब,आमोल केंगर, शाहबाज मुलाणी,ओंकार चौगुले,जमीर मुजावर, बंडोपंत चव्हाण, प्रेमकुमार वाघमारे,नितीन शिंदे,नामदेव बुरूंगे,महादेव करांडे,अनिल करांडे आदी सर्व सदरच्या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments