Type Here to Get Search Results !

सांगोला तालुक्यात वाहनांच्या बॅटऱ्या व डिझेल चोरी.

सांगोला तालुक्यात वाहनांच्या बॅटऱ्या व डिझेल चोरी.

माणदेश मैदान न्युज (बबन चव्हाण)

      सांगोला शहरा बरोबरच तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून चोरट्यांनी  आपला मोर्चा आता उभ्या असलेल्या वाहनांकडे वळवला आहे. सांगोला तालुक्यातील एका उद्योजकाच्या घराजवळ उभा केलेल्या तीन टिपर डंपर मधील तीन बॅटऱ्या व १०० लिटर डिझेलवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी योगेश बाबासाहेब खटकाळे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल केला आहे. शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी सक्रीय झालेल्या बॅटरीं चोरांवर पोलिसांनी अंकुश घालण्याची मागणी वाहनचालक व मालकांनी केले आहे.

           याबाबत अधिक माहिती अशी, की उद्योजक योगेश खटकाळे यांनी तीन टिपर डंपर घराजवळ उभे केले होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खटकाळे यांच्या टिपरमधील ७५ हजार रुपये किमतीच्या तीन बॅटऱ्या व ९ हजार १५५ रुपये किमतीचे १०० लिटर डिझेलवर डल्ला मारून पळून गेलेले आहेत. भरवस्तीत चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान सांगोला पोलिसांपुढे उभे राहिले आहे.बंद घरे लक्ष्य करुन किमती ऐवज लंपास करण्याची पद्धत चोरट्यांची नेहमीची झाली आहे. चोरट्यांनी आपला मोर्चा आता वाहनांकडे वळवला आहे. गस्तीच्या पोलिसांना ठेंगा दाखवत ऐवज लंपास करणारे चोरटे पोलिसांना वरचढ ठरत आहेत. चोरीसाठी आधुनिक तंत्र अवगत करणाऱ्या चोरट्यांनी पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण केले आहे.

Post a Comment

0 Comments