प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा ; "इतक्या" रुपयांनी अनुदानाची रक्कम वाढवणार.
माणदेश मैदान न्युज (कोळे - वाहिद आतार)प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आतापर्यंत घरकुलासाठी मिळणाऱ्या १.२० लाख रुपयांच्या अनुदानात ५०,००० रुपयांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
# महाराष्ट्र राज्याला एकूण २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एकूण २० लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, जे देशातील सर्वाधिक आहे. मागील ४५ दिवसांमध्ये १००% घरांना मंजुरी मिळाली असून १०.३४ लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे.उर्वरित १० लाख लाभार्थ्यांनाही लवकरच निधी मिळणार आहे.हा संपूर्ण टप्पा एकाच वर्षात पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
# प्रधानमंत्री आवस योजनेचे अनुदान अपुरे असल्याने घरकुल प्रकल्प रखडले.
घरकुल लाभार्थ्यांनी वेळोवेळी अनुदान अपुरे असल्याची तक्रार केली होती. सध्याच्या निधीत संपूर्ण घरकुल बांधणे मुश्किल होत असल्याने अनेक प्रकल्प अर्धवट राहिले आहेत. परिणामी, उद्दिष्ट साध्य होण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे सरकारने या योजनेसाठी अनुदान वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
# आगामी अर्थसंकल्पात तरतूद करणार.
यासंदर्भात राज्य सरकार पुढील अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करणार आहे. तसेच भूमिहीन लाभार्थ्यांसाठी अनुदान ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आले आहे.शबरी आवास योजनेत २.५ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील अनुदान २.१० लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची तयारी आहे.हा निर्णय लागू झाल्यास हजारो घरकुल धारकांना दिलासा मिळेल तसेच महाराष्ट्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल प्रकल्पांना वेग येईल.

!doctype>
Post a Comment
0 Comments