Type Here to Get Search Results !

बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना लाखों रूपयांचा गंडा , महूद येथे पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल...!

 बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना लाखों रूपयांचा गंडा , महूद येथे पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल...!

माणदेश मैदान न्युज (सांगोला प्रतिनिधी):- 

      पती-पत्नीनी बचत गट काढल्याचे सांगून महिलांकडून आकर्षक परतावा (व्याज) देतो, असे म्हणून प्रती महिना पैसे घेतले.पासबुक अथवा पावती न देता पैसेही परत दिले नाहीत म्हणून महिलेने महूद (ता. सांगोला) येथील शाहीद करीम मुलाणी व त्यांची पत्नी बास्मिन शाहीद मुलाणी (दोघे रा.महूद बु, ता. सांगोला) यांच्यावर ७२ हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी जयश्री बिरा लबटे (रा.महूद, ता.सांगोला) यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिल्याप्रकरणी पत्नी-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.शाहीद मुलाणी व पत्नी यास्मिन मुलाणी (रा. महूद, ता. सांगोला) हे गावातील महिलांचा बचत गट चालवतात. त्यांनी फिर्यादीस तुम्ही महिना ३०० रुपये भरल्यास तुम्हाला पाच वर्षानंतर ३४ हजार रुपये मिळतील, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने व तिचे नातेवाईक अनिता संतोष इरकर, स्वाती सचिन इरकर, सविता महेश इरकर रा.महूद यांनी भारतीय महिला स्वयं सहा बचत गट महूद, महाराष्ट्र झिंदाबाद स्वयं सहा. महिला बचतगट, महूद बु तसेच इतर तीन बचत गट असे एकूण ५ गटामध्ये ३०० प्रमाणे प्रती महिना दीड हजार रुपये एक फेब्रुवारी २०१९ ते ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ७२ हजार रुपये भरले आहे. 

         बचत गटाचे पैसे देताना शाहीर मुलाणी व त्याची पत्नी यास्मिन मुलाणी यांनी पैसे दिल्यानंतर कोणतीही पावती अथवा पासबुक दिले नाही. पावतीबाबत विचारले असता आमच्यावर विश्वास ठेवा, असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसे जमा करताना महिलांचे रजिस्टरवर सह्याही घेतल्या आहेत. दरम्यान २०२० साली फिर्यादीच्या मुलाच्या लग्नाकरीता पैशाची गरज असल्याने शाहीद मुलाणी व त्यांची पत्नी यास्मिन मुलाणी यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी बचतगटातून पैसे मिळत नसल्याचे सांगून उडवाउदीची उत्तरे दिली. शाहीद मुलाणी व त्यांची पत्नी यास्मिन मुलाणी यांच्याकडे मीनाक्षी कांबळे, शाबीर मुबारक तांबोळी, शांताबाई नामदेव कांबळे, केशाबाई निवृत्ती कांबळे, अंजुम शाहरुख मुलाणी, शाहीन रुबाब मुलाणी, चिमल रामचंद्र चंदनशिवे, पमाबाई सूर्यकांत कांबळे, अर्चना नानासो होळकर, जयश्री मारत बेरड, अलका भगवान जाधव, सीमा अजय काटकर, अलका निवृत्ती मोटे, ज्योती महेंद्र खाडे, सुवर्णा भारत कांबळे, माया दिलीप जावीर, उषा जालिंदर धुमाळ, संगीता शंकर पवार, कल्पना हनमंत जाचव, राजश्री अनिल कांबळे, शालन बळीराम कांबळे, स्वाती केशव कारंडे, सोनाली बाळासाहेब जाधव, सीमा श्रीनिवास माने, रक्षी महादेव माने, रतन प्रकाश महारनवर, अश्विनी संतोष नागणे, सुरेखा रामचंद्र कांबळे, द्रौपदा मधुकर नागणे, वैशाली शितल कांबळे, राजश्री कांबळे, छानुबाई रंगनाथ चैगुले, मुस्कान मिराज मुलाणी, सायरा मिराज मुलाणी, मनीषा दत्तात्रय कांबळे, सुरेखा मनोहर लवटे, मायावती जगदीश सुतार, लतीका कोदिंबाबा कांबळे, कमल शेकापा गायकवाड, ज्योती अमोल पळसे, स्वाती नवनाथ राजगुरु, ललिता मानाजी धुमाळ, सुवर्णा प्रकाश चव्हाण, मडाबाई शिवाजी जाधव, अनिता दादा घाडगे आदींची फसवणूक झाली आहे. याबाबत जयश्री लबटे यांनी शाहीर मुलांनी व यास्मिन मुलाणी या पती-पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments