Type Here to Get Search Results !

कामख्या देवी समोर कापलेल्या रेड्याची शिंग ; वर्षा बंगल्यावरून राऊतांचा खळबळजनक नवा दावा एकनाथ शिंदेंवर निशाणा.

 कामख्या देवी समोर कापलेल्या रेड्याची शिंग ; वर्षा बंगल्यावरून राऊतांचा खळबळजनक नवा दावा एकनाथ शिंदेंवर निशाणा.

माणदेश मैदान न्युज (कार्यकारी संपादक)

        महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काळी जादू झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.तर आज याच वर्षा बंगल्यावरून राऊतांचा नवा दावा करत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत ? मनात कसली भिती आहे ? इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, वर्षा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे, तिथे मुख्यमंत्री का जात नाहीत ? याचे उत्तर "लिंबू सम्राटने द्यावे" असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी ही मागणी केली. इतकंच नाहीतर भाजप गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीसमोर रेडे कापून पुरली आहेत. असे स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला.

        आमचा विश्वास नाही, पण मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये यासाठी मंतरलेले शिंग आणल्याचे आम्ही ऐकले आहे. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पळणारी लोक आहोत असं संजय राऊत म्हणाले. तर महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा आहे, अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम करणाऱ्या सर्वांनी महाराष्ट्रातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले, तरीही महाराष्ट्र मध्ये अंधश्रद्धा कायम आहे. उदय सामंत हे सुद्धा कोकणातले आहेत, त्यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी त्याचे काम करत रहावे. आम्ही आमचे काम करत राहू असं संजय राऊत म्हणाले.

Post a Comment

0 Comments