Type Here to Get Search Results !

ठाकरे गटाची फायरब्रँड तोफ संजय राऊत यांची भाजपच्या बड्या मंत्र्यावर जहरी टीका.

 ठाकरे गटाची फायरब्रँड तोफ संजय राऊत यांची भाजपच्या बड्या मंत्र्यावर जहरी टीका.

माणदेश मैदान न्युज (कोळे - प्रतिनीधी) - 

        उद्धव ठाकरे यांचे मानसिक संतुलन ढासळलं असून ते बेताल विधान करत आहेत. प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय हा योग्य आहे. हे कायद्याचे राज्य आहे. अशी टीका भाजपचे नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्याचं भाषेत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'कोण विखे पाटील जे दहा वेळा पक्ष सोडून पळून गेले. त्यांना पहिलं मंत्रिपद शिवसेनेने उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. त्यांनी विसरू नये. त्यांनी अनेक पक्ष बदललेले आहे.

       "दहा वेळा साड्या जशा बदलतात तसा पक्ष बदलणारी ही लोकं आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये" असं संजय राऊत यांनी पलटवार करत जिव्हारी लागणारी टीका केली आहे. पुढे ते असेही म्हणाले, तुम्हाला देखील भविष्यात धक्का बसेल विसरू नका. धक्का बसू नये म्हणून तुम्ही पक्ष बदलत आहात. हिम्मत आणि धाडस असते तर पक्ष बदलले नसते. ज्या काँग्रेस पक्षांनी हक्काने तुम्हाला सर्व काही दिलं मानपान,पद,प्रतिष्ठा,सत्ता शिवसेनेने देखील तुम्हाला दिली आहे. त्या शिवसेनेबद्दल तुम्ही असं वक्तव्य करतात हा निर्लज्य आणि नीचपणा आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Post a Comment

0 Comments