*जत तालुक्यातील करजगी येथे घडलेल्या निंदनीय कृत्याचा निषेध करण्यासाठी द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार*.
जत प्रतिनिधी - जत तालुक्यातील करजगी गावातील आरोपीस फाशी देण्याची मागणी द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटन वतीने जत पोलिसांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सर्वप्रथम द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटन वतीने घडलेल्या घटनेचं तीव्र स्वरूपात निषेध करतो सांगली जल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी या गावातील गुरुवारी दुर्दैवी घटना घडली ४ वर्षीय चिमुरडीचा शेजारीच राहनाऱ्या ४५ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून गळा दाबून खून केला. पांडुरंग सोमनिंग कल्ली असे त्या नराधमाचे नाव आहे. हि घटना गुरुवारी सकाळी ०९ वाजण्याच्या सुमारास घडली. त्या नराधमाने त्या चिमुरडीचा मृतदेहा पत्र्याच्या पेटीत लपवण्याचे धक्कादायक प्रकार केले आहे. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीचा केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून सदर आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागणीचा निषेदार्थ निवेदन आपणास देण्यात येत आहे, तरी आमच्या भावना आपन जिल्हा पोलिस प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, ही द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघटन, अजित। गायकवाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, विजय शिवाजी माळी जत तालुक्यातील करजंगी येथे घडलेल्या निंदनी कृत्याचा निषेध .. जत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर , उपविभागीय पोलीस अधिकारी जत सुनील साळुंखे , जत तहसीलदार , सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सत्वन करण्यात आले व निवेदन देण्यात आले यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजित गायकवाड- पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष विजय माळी, सांगली जिल्हा महिला अध्यक्षा रेश्मा एमडे , कवठेमहाकाळ तालुका अध्यक्षा अमृता मोहिते, सांगोला तालुका उपाध्यक्ष वामन ठोकळे, जत तालुका उपाध्यक्ष अमोल गोरे, विजय मोहिते मिरज तालुका ग्रामीण अध्यक्ष यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.

!doctype>
Post a Comment
0 Comments