महाराष्ट्रातील राजकारणाचा कारभार हा दिल्ली मधून चालणार का ? एकनाथ शिंदे चां सत्कार आज शिवसेने चे आमदार-खासदार शरद पवार यांच्या भेटीला.
माणदेश मैदान न्युज (सांगोला प्रतिनिधी)मागील गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील राजकारणात घडामोड घडताना दिसत आहेत.राज्यातील राजकीय घडामोडींना दिल्लीत वेग येऊ लागलाय.येत्या काही दिवसात महापालिका निवडणुकांची घोषणा होऊ शकते.त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाल्यानंतर आज शिवसेनेचे आमदार उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.मंत्री उदय सामंत हे दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांपासून त्यांनी बैठकींचा धडका लावलाय.आता पवारांच्या भेटीला गेल्याने राज्यातील राजकारणाला राजधानी दिल्लीत फोडणी दिली जात असल्याचं दिसत आहे.काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि आमदार उदय सामंत आज शरद पवार भेटीला गेले आहेत. काल शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला होता.
त्यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याविषयी स्तुतीसुमने उधळली. मात्र यावरून महाविकास आघाडीमधील मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केलीय.जे लोक महाराष्ट्र तोडण्याची गोष्ट करत आहेत, त्यांचा सत्कार शरद पवार करत असल्याची टीका संजय यांनी केली होती. राऊतांच्या टीकेनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना आडेहात घेतलं.तो विषय संपत नाही तोच दुसरा राजकारणातील दुसरा पाडाव पडलाय.आज शिदें गटाचे राज्यातील उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार नरेश म्हस्के हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत.शरद पवारविषयी काय म्हणाले एकनाथ शिंदे शरद पवारांचे सासरे सदाशिव शिंदे हे क्रिकेटमध्ये गुगली टाकायचे. तर पवार साहेबांनी राजकारणात गुगली टाकतात. त्यांनी टाकलेली गुगली अनेकांना कळत नाही. कधी-कधी बाजूला बसलेल्या किंवा बसवलेल्या लोकांनाही त्यांची गुगली कळत नाही. पण माझ्याबद्दल थोडं वेगळं सांगतो. माझे पवार साहेबांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी मला कधीही गुगली टाकली नाही, यापुढेही टाकणार नाहीत, असं विधान एकनाथ शिंदे यांनी सत्कारावेळी केले होते.
राजकारणात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. वेगवेगळी विचारधारा असली तरी त्यांच्याशी संबंध जपावे लागतात. राजकारणात नातं कसे जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असंही शिंदे म्हणाले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झालेत. संजय राऊत यांनी शरद यांच्यावर जळजळीत टीका केली. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा नव्हे तर अमित शाह यांचा सत्कार केला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.राज्याचे तुकडे करणाऱ्या अमित शाह यांचाच सत्कार केलाय, अशी टीका संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना केली. संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गट राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील दुरावा दिसून येतोय. तसेच शरद पवार यांनी दिल्लीतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली यावरही संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

!doctype>
Post a Comment
0 Comments