राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष नक्की कोणाचा याबाबत आज " सुप्रीम " कोर्टात होणार सुनावणी.
माणदेश मैदान न्युज (विशेष प्रतिनिधी)राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच ही सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे.दरम्यान, विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांनंतर कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नये असे निर्देश देखील दिले होते. म्हणून आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.कोर्ट नेमका काय निर्णय देणार हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments