माणदेश मैदान न्युज / कार्यकारी संपादक)
शैक्षणिक धोरण सन२०२० मध्ये काही बदल केले गेले आहेत. या धोरणांमुळे मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या माहितीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला अपार कार्ड मिळणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे अपार कार्ड म्हणजे स्वतःचे वेगळे ओळखपत्र असेल.
अपार कार्डमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती ऑनलाइन पद्धतीने सेव्ह केली जाणार आहे.तसेच डिजिलॉकर देखील दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. एक देश, एक विद्यार्थी ओळख या संकल्पनेवर हे अपार आयडी आधारित आहे.
अपार आयडी म्हणजे ऑटोमेटेड अककॅडमिक अकाउंट रजिस्ट्री.पूर्व प्राथमिक ते कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे कार्ड मिळणार आहे. यात १२ अंकी युनिक नंबर असणार आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती एका ठिकाणी सेव्ह करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्याची सर्व माहिती डिजिलॉकरमध्ये सुरक्षित राहावी, त्यामुळे हा उपक्रम राबवला आहे.यामध्ये विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे म्हणजेच दहावी-बारावीचा निकाल, दाखला अशा सर्व गोष्टी सेव्ह असणार आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त नंबर टाकून या गोष्टी लगेच उपलब्ध होतील.जर एखाद्या विद्यार्थ्याला नवीन शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना सर्व कागदपत्रे घेऊन जायची गरज नाही. त्यांना फक्त तुमचा अपार आयडी क्रमांक विचारला जाईल.
अपार आयडी हे शाळा किंवा महाविद्यालये बनवणार आहे. परंतु यासाठी पालकांची संमती घेणे आवश्यक आहे. शिक्षक हे पालकांची संपर्क नक्की साधणार आहे. त्यानंतर काही माहिती विचारली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे अपार कार्ड बनवले जाईल.डिजिलॉकरमध्ये तुमची सर्व कागदपत्रे सेव्ह राहणार आहे. क्लाउडवर आधारित तुमच्या कागदपत्रांसाठी खास जागा उपलब्ध होणार आहे. तुमची माहिती, प्रमाणपत्रे सर्वकाही सेव्ह केले जाणार आहे.

!doctype>
Post a Comment
0 Comments