Type Here to Get Search Results !

भारत देशातील उत्तराखंड या राज्यात अखेर समान नागरिक कायदा लागू.

 भारत देशातील उत्तराखंड या राज्यात अखेर समान नागरिक कायदा लागू.

माणदेश मैदान न्युज (कार्यकारी संपादक) ;- 

      उत्तराखंड या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे.असा कायदा लागू करणारे उत्तराखंड हे भारत देशातील पाहिले राज्य बनले आहे. गेल्या वर्षी ७ फेब्रुवारी रोजी उत्तराखंड विधानसभेने समान नागरी कायदा मंजूर केला होता.परंतु त्याची अंमलबजावणी आणि नियम कायदे तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या गठित समितीने १८ ऑक्टोबर रोजी आपला अहवाल सादर केला होता. दरम्यान देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसात उत्तराखंडला लवकरच भेट देणार आहेत या आधी राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात आला आहे. हा कायदा लागू झाल्यावर आता उत्तराखंड या राज्यात विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप आणि वारसा हक्का संबंधी काही नियम बदललेले आहेत.

          या समान नागरिक कायद्यानुसार, विवाहित दाम्पत्याला सहा महिन्यांच्या आत त्यांच्या विवाहाची नोंद करणे बंधनकारक असणार आहे. इतकेच नाही तर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या जोडप्यांना कायदा लागू झाल्यानंतर नोंदणी करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाणार आहे. उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव शैलेश बगोली यांनी राज्यात यू.सी.सी लागू करण्यासंबंधीची घोषणा केली होती. तसेच त्यांनी हेही स्पष्ट केले होते की उत्तराखंडच्या राज्याच्या बाहेर राहत असलेल्या राज्यातील नागरिकांना देखील हा कायदा लागू होणार आहे.

Post a Comment

0 Comments