Type Here to Get Search Results !

बिनखात्याचं मंत्री केलं तरी एकनाथ शिंदे मंत्रिपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांचा टोला.

बिनखात्याचं मंत्री केलं तरी एकनाथ शिंदे मंत्रिपद सोडणार नाहीत; संजय राऊत यांचा टोला.

माणदेश मैदान न्युज (वाहिद आतार) :- 

         महाराष्ट्र राज्याचे मंत्री धनंजय मुंडे दिल्ली येथे गेले आहे.त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.धनंजय मुंडे यांचे नेते अजित पवार आहेत.पण मुंडेंना खुलासा द्यायला दिल्लीत जावं लागतं.त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष बारामतीत आहेत.तरी ही ते दिल्लीला गेले आहेत.ही महाराष्ट्राची आजची अवस्था आहे,अशी टीका उ.बा.ठा गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

         आपण नाराज आहोत की नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून समोर येऊन सांगितलं पाहिजे.किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी याचा खुलासा केला पाहिजे,असं सांगतानाच एकनाथ शिंदे ज्या अर्थी मंत्रिपदाच्या खुर्चीला चिटकून बसले आहेत, त्या अर्थी ते नक्कीच नाराज नाहीत.त्यांना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत,असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

एकनाथ शिंदे नाराज आहे की नाही त्यांनी सांगितलं पाहिजे. किंवा त्यांचे बॉस देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी याबाबत सांगावं. ज्या अर्थी एकनाथ मंत्रीपदाला चिटकून बसले आहेत. त्या अर्थी ते नाराज नाहीत. बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रीपद सोडणार नाहीत.तेवढी हिंमत लागते.कारण त्यांच्या डोक्यावर ईडी जाणि सी.बी.आय. ची तलवार आहे. अशा लोकांना बिनखात्याचं मंत्री केलं तरी ते गप्प बसतील. ते कसं काय सांगतील मी नाराज आहे? असा खोचक सवालच संजय राऊत यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments