Type Here to Get Search Results !

सांगोला तालुक्यातील कटफळ पोलिस स्टेशनची दुरावस्था झाल्याने कटफळ पोलिस स्टेशन बनतोय तळीरामांचा अड्डा...!

सांगोला तालुक्यातील कटफळ पोलिस स्टेशनची दुरावस्था झाल्याने कटफळ पोलिस स्टेशन बनतोय तळीरामांचा अड्डा...!

 लोटेवाडी प्रतिनिधी {माणदेश मैदान न्युज }

      सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.सांगोला तालुक्यातील कटफळ हे गाव सांगोला शहरापासून सुमारे २० -२५ किलोमीटर अंतरावर असून कटफळ गावात पोलीस चौकी ही ब्रिटिश कालीन असून त्याची दुरावस्था झालेली आहे.त्या ठिकाणी नियुक्त केलेले पोलिस अधिकारी हे पाहतात सांगोला पोलिस स्टेशनमधून  पाहतात कटफळ पोलिस स्टेशनचां कारभार येथे वारंवार भांडण तंट्याच्या तक्रारी असतात.गावातील पोलीस चौकीच धूळ खात पडलेली असून त्या ठिकाणी काही तळीराम हे मनसोक्तपणे दारू पीत असतात जणू काही हा तळीरामांसाठी जणू अड्डा बनलेला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.सदरची पोलिस  चौकी मध्ये दारूच्या मोकळ्या बाटल्या ही पडलेल्या असून पोलिस चौकी सतत बंद अवस्थेत असते. त्यामुळे नागरिकांनी तक्रारी करायच्या कोणाकडे ? तसेच आम्हाला न्याय देणार कोण ? आम्ही न्याय मागायचा कोणाकडे ? असा सवाल कटफळसह इतर पंचक्रोशीतील सर्वसामान्य जनता करीत आहे.सांगोला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार किंवा गुन्हे दाखल करण्यासाठी सांगोला पोलीस स्टेशन कडे जावे लागत असते. कटफळ गावामध्ये पोलीस येतात का तरी? आले तर कुठे येतात ? कुठे बसतात काय करतात? असा सवाल नागरिकांमधून निर्माण झाला आहे. तसेच कटफळ येथे मटका,जुगार,दारू, गुटखा, अवैध्य रित्या वाळू उपसा व खाजगी सावकारी ही जोमात सुरू असून जेणे करून अवैध धंद्याना ऊतच आला आहे.त्यामुळे गावातील नागरिक हे खूपच संतापले आहेत.तात्काळ पोलीस चौकी चालू करून संबंधित पोलीस अधिकारी हे जनतेच्या सेवेसाठी २४ तास पोलीस चौकीमध्ये थांबण्याची मागणी पंचक्रोशीतील सर्व गावातील नागरिकांनी केली आहे.

                            यामध्ये प्रामुख्याने कटफळ,महुद,चिकमहुद,बंडगरवाडी,,इटकी,खवासपुर,अचकदाणी,लक्षीनगर,वाकी(शि),खिलारवाडी,गायगव्हाण,ढाळेवाडी,महिम,सोनलवाडी,बागलवाडी जाधववाडी, लोटेवाडी,नरळेवाडी,आदी इत्यादी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. कटफळ पोलिस स्टेशन चे नियुक्त केलेले अधिकारी हे  फक्त हफ्ते घेण्यासाठीच गावामध्ये येतात का ? असा प्रश्न सर्वसामान्य जनता करीत आहे.तरी वरीष्ठ अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देवून सदरची पोलिस चौकी सुरू करावी अशी मागणी कटफळसह पंचक्रोशीतील सर्व नागरिक करीत आहे.

Post a Comment

0 Comments