कोळे येथे व्यापारी असोशिएशन यांचे वतीने भव्य शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन.
कोळे प्रतिनिधी (वाहिद आतार ) :-सांगोला तालुक्यातील कोळे येथील व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने भव्य अश्या शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ ते १६ क्रमांक पर्यंत बक्षीशे ठेवण्यात आलेले आहेत. बाहेर गावाहून आलेल्या सर्व खेळाडूंसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.सदरची शूटिंग बॉल स्पर्धा राजवाडा जिल्हा परिषद शाळा कोळे या ठिकाणी पार पडणार आहेत.
तरी सर्व व्यापारी पदाधिकारी सदस्य सभासद नेतेमंडळी ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद व आजी-माजी सर्व सदस्य व्यापार वर्ग सर्वांनी उद्या रविवारी दिनांक १९/०१/२०२५ रोजी ठीक दोन वाजता जिल्हा परिषद शाळा कोळे या ठिकाणी शूटिंग बाॅल टूर्नामेंट चे उद्घाटन आहे. व शूटिंग बॉल स्पर्धा ह्या वेळेत सुरू होतील तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्यापारी असोशियन कोळा यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे तरी सर्व लोकांनी शूटिंग बॉल स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.

!doctype>
Post a Comment
0 Comments