शेतकऱ्यांच्या एफआरपी,दूध दरवाढीच्या हिताचा निर्णयासाठी बळीराजा शेतकरी संघटना यांचेकडून आंदोलनाचा इशारा.
माणदेश मैदान न्यूज / सातारा प्रतिनिधी :-चालू हंगामात एफआरपी दर जाहीर न करणे तसेच दुधाचे दर व अनुदान वाढवून देण्याच्या प्रश्नावर बळीराजा संघटनेच्या वतीने १३ डिसेंबर रोजी मायणी (ता. खटाव) येथे सकाळी १० वा. आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बळीराजा संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष डॉ.उन्मेष गणपतराव देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिला आहे. सांगली व सातारा जिल्ह्यात ऊस पट्टयातील
कारखान्यांनी दर जाहीर केला नाही. त्यांनी शेतकऱ्यांना पहिला हप्ता ४ हजार रुपये द्यावा. तसेच शासनाने म्हैशीच्या दुधाला १०० रुपये दर तसेच अनुदानाच्या रक्कमेत वाढ देण्यात करावी. या मागण्या घेऊन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येणार असलेबाबत निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, तहसीलदार पोलीस प्रशासन आदिना देण्यात आल्या आहेत.

!doctype>
Post a Comment
0 Comments