डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली आमदारकीची व गोपनीयतेची शपथ...!" सांगोला तालुक्यात पुन्हा देशमुख पर्वाची सुरुवात."
माणदेश मैदान न्यूज संपादक / बबन चव्हाण.सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित नूतन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी रविवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.विधानसभेचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे.यावेळी आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी गोपनियतेची शपथ घेतली.महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे भीष्माचार्य स्व.गणपतराव देशमुख तथा
आबासाहेब यांच्या स्मृतीस स्मरण करून सुरुवात करत आ.डॉ..बाबासाहेब देशमुख यांनी शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी 'जय हिंद, जय मल्हार,जयभिम चा नारा दिला.
विधानसमा विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी विविध पक्षाच्या उर्वरित आमदारांनी शपथ घेतली.शपथविधी सोहळा अजूनही सुरू असून हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आमदाकीची शपथ दिली.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेने जल्लोष केला.शेकाप कार्यकत्यांनी सोशल मीडियाद्वारे डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. शपथविधी सोहळ्यानिमित डॉ. बाबासाहेब देशमुख मुंबई येथे आहेत. त्यांच्या निवडीबद्दल मुंबई येथील विविध समाज घटकातील असंख्य कार्यकत्यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या,शपथविधी प्रसंगी बंधू डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या आई सरोजिनी देशमुख, पत्नी डॉ.निकिताताई देशमुख यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
विश्वविक्रमी आमदार स्व.भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर डॉ.बाबासाहेब देशमुख हे प्रथमच विधानसभा निवडणुकीसाठी सामोरे गेले होते. कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नसताना देखील या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील
स्वाभिमानी जनतेच्या विकासावर त्यांनी २५००० पेक्षा अधिक मताधिक्यांनी विजय मिळविला. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शपथ घेताना स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे स्मरण केल्याने स्व.आबासाहेब यांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असल्याचे चित्र सांगोला तालुक्यात दिसून आले.तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून शपथ घेऊन जयभिम म्हणून शपथविधी पूर्ण केला.

!doctype>
Post a Comment
0 Comments