Type Here to Get Search Results !

पहिल्यांदाच नागपूर येथे महायुतींचा सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा.

 पहिल्यांदाच नागपूर येथे महायुतींचा सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा.

(माणदेश मैदान न्यूज / विशेष प्रतिनिधी) :- 

          महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजणेच्या सुमरास नागपुरातील राजभवनावर हा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार असून यावेळी भारतीय जनता पक्षाचे २१, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे १० नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समजते आहे. दुसरीकडे येत्या १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 

             हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणे हे अत्यंत महत्त्वपुर्ण आहे. त्यामुळे यावेळी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे यावेळी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आणि नक्की कोणाला डच्चू मिळणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.दरम्यान,१९९१ नंतर पहिल्यांदाच नागपूर या ठिकाणी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. १९९१ मध्ये मंत्री छगन भुजबळांनी ९ आमदारांसह शिवेसना सोडल्यानंतर नागपुरात शपथविधी सोहळा पार पडला होता. त्यावेळचे तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांनी त्यांना शपथ दिली होती.नागपूर आणि विदर्भाचं स्थान मजबूत करण्यासाठी शपथविधीसाठी नागपूरची निवड झाल्याची चर्चा होत आहे.

Post a Comment

0 Comments