एकता महिला मंच यांच्यावतीने आरोग्य शिबीराचे आयोजन.
(माणदेश मैदान न्यूज / बार्शी प्रतिनिधी)एकता महिला मंच यांच्यावतीने महिलांसाठी व मुलींसाठी आरोग्य शिबीरात एकूण 350 तपासणी- आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी अंगणवाडी क्रं 2 गौडगाव ता. बार्शी येथे "एकता' महिला मंचच्यावतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव,डॉ पल्लवी कानिटकर, डॉ. प्रज्ञा सरवदे, डॉ अमृता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान एकता महिला मंचच्या वतीने करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव बोलताना म्हणाले की एकता महिला मंचच्या माध्यमातून हे आरोग्य शिबिराचे आयोजन केले हे खूप छान पद्धतीने नियोजन केले असून महिलांच्या आरोग्य विषयी शिबिर घेणे हे गरजेचे होत हे ह्या एकता महिला मंचच्या माध्यमातून महिलांसाठी उपलब्ध करून दिल खरंच हा उपक्रम खूपच सुंदर पद्धतीने आयोजन केला आहे तसेच डॉ.पल्लवी कानिटकर यांनी श्री साई आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल वैराग याविषयी सविस्तर माहिती दिली . या आरोग्य शिबिरामध्ये महिलांचे मासिक पाळी,संधिवात ,आमवत ,रक्तदाब ,साखर , थायरॉड , तसेच महिलांचे वेगवेगळे आजार यावरती तपासणी करण्यात आली.
यामध्ये महिला व मुलींची एकूण 350 तपासणी करण्यात आली यावेळी श्री साई आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल वैराग यांनी हे शिबिर घेण्यासाठी सहकार्य केले त्यामध्ये डॉ पल्लवी कानिटकर,डॉ. प्रज्ञा सरवदे डॉ. अमृता शिंदे,नीता पवार,संपदा अन्व्हणे,प्रतीक राठोड,वेदांत इलानी, ओमकार कल्याणकर,आशुतोष मुठाळ उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर तसेच एकता महिला मंचच्या अध्यक्षा शालन दसवंत,मनीषा सुतार,विजया यादव, उज्वला चव्हाण,सविता दसवंत, दिपाली काजळे,सुकनंदा सुरवसे,सारिका सुतार,ज्योती कुंभार, मैना सोनवणे, वैशाली पैकेकर,भाग्यश्री लाटे, विजया दसवंत, महादेवी माने, उषा गरड, शुभांगी भड,विद्या भड,अर्चना भड, मथुरा दसवंत, मुद्रिका दसवंत,शोभा काजळे, सरिता काजळे, उषा सुतार, रीना गुरव, उज्वला गुरव, अर्चना माने,मैना भड, अनिता दसवंत,अशा पैकेकर,अश्विनी दसवंत, शितल काजळे, अरुणा काजळे,दामिनी दसवंत, प्रियंका दसवंत, बालिका सुतार, कांचन सुतार, सिंधू दसवंत, वैष्णवी सुरवसे, मनीषा काजळे, अनुजा काजळे, शामल सुतार,वसुधा कुंभार, सरस्वती चादरे इ सदस्या व गावातील महिला तसेच मल्टीपर्पज हायस्कूल येथील मुली मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.

!doctype>
Post a Comment
0 Comments