Type Here to Get Search Results !

*श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी चे चेअरमन माधवरावजी घाटगे यांच्या प्रयत्नातून श्रावणबाळ वृध्दाश्रमास रुग्णवाहिका प्रदान*

 *श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी चे चेअरमन माधवरावजी घाटगे यांच्या प्रयत्नातून श्रावणबाळ वृध्दाश्रमास रुग्णवाहिका प्रदान* 

               घोसरवाड/प्रतिनिधी सुनिल नाईक 

जनसेवा हीच ईश्वर सेवा असे समजून श्रावणबाळ वृद्धाश्रम अकिवाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे गेली पाच वर्षे अति कष्टाने गोरगरीब निराधार वंचित नागरिकांना या आश्रम मध्ये मानाचे स्थान आहे या नागरिकांना आरोग्याची कोणतीही अडचण येऊ नये यासाठी श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी चे चेअरमन व कार्यकारी संचालक आमचे आधारस्तंभ माननीय माधवराव जी घाटगेदादा यांनी एक सामाजिक कार्य म्हणून श्रावण बाळ वृद्धाश्रम येथे रुग्णवाहिका ची फार आवश्यकता होती म्हणून माननीय राज्याचे वैद्यकीय व उंचतंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नातून सुरेश सासणे संचलित श्रावण बाळ वृद्धाश्रम यांना साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्तअसलेला दसऱ्या दिवशी गुरुदत्त साखर कारखान्या ंच्या आवारात भव्य असा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमध्ये रुग्णवाहिका प्रदान करण्यात आलीयावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अशोकराव माने हे होते याप्रसंगी कुरुंदवाड नगरीचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे तात्या, माननीय राजवर्धन नाईक, निंबाळकर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राचार्य चंद्रकांत मोरे गुरुदत्त शुगरचे संचालक शिवाजी माने देशमुख भारतीय जनता पार्टी शिरोळतालुका अध्यक्ष माननीय मुकुंद गावडे, आंदोलन सम्राट विश्वासराव बाली घाटे, डॉ.संदीप नागणे विजय मगदूम, अरुण ऐनापुरे, शाबुद्दीन टाकवडे सर, शेती अधिकारी ओम प्रकाश तांबोळे, शशिकांत चौधरी शिरढोणचे तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद कांबळे संजय दनाने बाहुबली मालगावे स्वप्निल सासणे विलास सासणे चंद्रकांत सासणे महावीर मगदूम रावसाहेब बिरोजे मल्लाप्पा कोरे शिवाजी कोळी व सर्वधर्मसमभाव नवरात्र उत्सवाचे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments