Type Here to Get Search Results !

व्हेरिफाइड असंघटित / स्थलांतरित कामगार करीता अन्नधान्य उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश...!

 व्हेरिफाइड असंघटित / स्थलांतरित कामगार करीता अन्नधान्य उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश...!

कोरेगांव प्रतिनिधी :- 

       केंद्र शासनाच्या ईश्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलातरींत/असंघटीत कामगारांना मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ०४/१०/२०२४ रोजी सर्व व्हेरीफाईड स्थलांतरीत कामगारांना शिधापत्रिका तसेच त्यावर अन्नधान्य उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार सह सचिव महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांनी राज्यातील सर्व ईश्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलातरींत/असंघटीत कामगार ज्यांचेकडे शिधापत्रिका नाहीत अशा पडताळणी झालेल्या कामगारांना अनुज्ञेय शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणेबाबत कळविले आहे. त्यानुसार कोरेगांव तालुक्यामध्ये ईश्रम पोर्टलवरती नोंदणी केलेले असंघटीत कामगार ज्यांना शिधापत्रिका नाही यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार कोरेगांव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments