Type Here to Get Search Results !

*टाकळीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी यांच्याकडून परंपरागत हातका सण मोठ्या उत्साहात साजरा*

 *टाकळीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी यांच्याकडून परंपरागत हातका सण मोठ्या उत्साहात साजरा*

घोसरवाड /प्रतिनिधी सुनिल नाईक 

टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जिल्हा परिषद शाळा कुमार विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थिनी कला, क्रीडा, सांस्कृतिक, परीक्षेमध्ये, अव्वल आहेत. याचबरोबर हातका सण साजरा करण्यामध्ये सुद्धा कुठे कमी नाहीत.परंपरागत हातका सण उत्साहात साजरा करण्यात आला.

हातका या सणाची गाणी म्हणण्यात आली. विद्यार्थिनी आणलेल्या डब्यामध्ये वेगवेगळे खिरापती घेऊन आलेले होते. डब्यातील खिरापती ओळखण्यासाठी अनेक विद्यार्थिनी शकल्ल लढवत होते. 

सर्व खिरापती डबे मध्यभागी ठेवून  पाटी वरती हत्ती काढून या भोवती विद्यार्थिनी हातका गाणी म्हणण्यात आली.

विद्यार्थिनी आणलेले सर्व खिरापती एकमेकांना  प्रसाद म्हणून सर्वांना वाटण्यात आला. सर्व विद्यार्थिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments