Type Here to Get Search Results !

*सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन अटळ; अक्षय विभुते यांच्या मनसे कामांमुळे*

 *सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन अटळ; अक्षय विभुते यांच्या मनसे कामांमुळे*

कोरोना काळात घरा-घरात जावून केलेलेल्या कामाची पुण्याई येणार कामाला

सांगोला (वार्ताहर):- राजकारणात कोणीच अमृत पिऊन आलेला नसतो... लोक बड्या बड्यांचे तख्त उलघून टाकत... जो काम करील, जनतेच्या सुखा - दुःखात पहाडासारखा पाठीशी उभा राहील... त्याला साथ देत असतात... सांगोला विधानसभेत  यावेळी अशीच परिस्थिती असून मनसेचे विधानसभा अध्यक्ष अक्षय विभुते यांनी कोरोना महामारीच्या काळात 'जीथे कमी तिथे मी म्हणत लोकांना मदत केली... पहिल्या लाटेत २ हजार कुटुंबांना 'असैनिक अल्बम', हे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे होमीओपॅथीचे औषध मोफत वाटले. 

      गोरगरिबांना किराणामाला सह भाजीपाला देखील घरपोच वाटप केला... कोरोना रुग्णांना बेड मिळत नसतानाच्या काळात मेडशिंगी कोरोना सेंटर मध्ये बेड उपलब्ध करून दिले... राज साहेब ठाकरे व दिलीप बापू धोत्रे यांचा विश्वासू असलेला अक्षय विभुते यांनी केलेल्या 'मनसे' कामामुळे सध्या अक्षय विभुते यांच्याच नावाची चर्चा आहे... त्यामुळे सांगोला विधानसभेत  यावेळी परिवर्तन अटळ असून दिग्गजांना पराभवाचा धस्सका बसणार आहे.

    *जो आवाज देईल त्याच्या,, हाकेला ओ देणारा मनसैनिक सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कोरोना काळात गायब असताना अध्यक्ष अक्षय विभुते हे जो आवाज देईल,, त्याच्या हाकेला ओ देत होते.. पूर्ण काळात रक्ताच्या नात्यातील माणसे बाधीत रुग्णांच्या जवळ येत नसताना अक्षय विभुते यांनी मेडशिंगी कोरोना सेंटर मध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली एवढेच नव्हे तर रस्ते विज पाणी असे कोणतेही प्रश्न असो, अक्षय विभुते एका हाकेवर धावून जात प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात.*

Post a Comment

0 Comments