आगामी येणाऱ्या गणपती सणा निमित्ताने पंचायत समिती सांगोला भवन येथे बैठीकीचे आयोजन..
कोळे प्रतिनीधी / सांगोला तालुक्यातील व त्याचबरोबर ग्रामीण भागातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी गणेशोत्सव कालखंडामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सांगोला तालुक्यातील सर्व पोलीस-पाटील यांची महाराष्ट्र राज्य शासन यांनी आगामी येणारा गणेशोत्सव सण हा साजरा करत असताना महाराष्ट्र शाशनाने ज्या काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत त्यावर विचार विनिमय करण्यासाठीं सांगोला पोलिस स्टेशनच्या वतीने दि.२७ आगस्ट २०२४ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता सांगोला पंचायत समिती भवन येथे गणपती बाप्पा च्या सणा संदर्भामध्ये संगोल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक श्री.भिमराव खणदाळे साहेब हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तरी सदर बैठकीस सांगोला तालुक्यासह इतर ग्रामीण भागातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष / सर्व पदाधिकारी / पोलिस पाटील यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सांगोला पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.

!doctype>
Post a Comment
0 Comments