किन्हाईचे प्राचीन श्री महादेव मंदिर..
श्रावण महिना म्हणजे भगवान शिवशंकराची उपासना करण्याचा काळ समजला जातो.हिंदू धर्मात श्रावण हा पवित्र मानतात व याच महिन्यात सर्व देव देवतांच्या पूजा अर्चा भक्तगण करतात पण श्रावण महिना भगवान शिवशंकरांच्या आराधण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. या महिन्यातील श्रावणी सोमवारी शिवभक्तांची अलोट गर्दी आपल्याला कित्येक शिव मंदिरामध्ये पाहवयास मिळते. स्कंदपुराणातील एका कथेनुसार भगवान शंकरांना हा महिना प्रिय का आहे असं विचारल्यावर भगवान शंकर म्हणतात की देवी सतीने तिचे पिता दक्ष यांच्या इच्छाविरुद्ध महादेवाची विवाह करून प्रत्येक जन्मात हाच पती मिळावा असं पण केलं होतं परंतु आपल्या वडिलांकडून पतीचा झालेला अपमान तिला सहन झाला नाही म्हणून देवी सतीने योगशक्ती देहत्याग केला त्यानंतर तिने दुसऱ्या जन्मात हिमाचल व राणी मैना यांच्या घरी मुलीच्या रूपात जन्म घेऊन तिचं पवित्र नाव ठेवण्यात आले. पुढे देवी पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर वृत्त केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न केले व त्यांच्याशी विवाह केला.
प्राचीन काळापासूनच पवित्र अशा महाराष्ट्र भूमीतील भगवान शिवशंकरांच्या मंदिराची पूजा विशेष करून श्रावणात केली जाते या श्रावणात मासातील सोमवारच्या निमित्ताने़ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किन्हाई गावातील श्री महादेव मंदिराचे केलेले दर्शन. मनाला नेहमीच विलक्षण देणारे हे श्री महादेव मंदिर कि न्हाई गावात वसलेला असून सकाळची प्रसन्नता तर संध्याकाळची शांतता अनुभवायची असेल तर या मंदिराला आपल्याला भेट घ्यायलाच हवी. कोरेगाव तालुक्यातील जीवन वाहिनी असलेल्या वांगणा नदीच्या तीरावर वसलेल्या मंदिराला भेट घ्यायची असेल तर आपल्याला दोन मार्गाने जाता येते. पहिला मार्ग सातारा वाढे फाटा वडूथ सातारा रोड कि न्हाई आस आहे . तर दुसरा मार्गा कोरेगाव जळगाव सातारा रोड कि न्हाई असा आहे. श्री महादेव मंदिराचे वातावरण अतिशय पवित्र आणि शांत आहे श्री महादेव मंदिर आणि प्राचीन पुरातन असून जुन्या कालखंडापासून त्याने आपल्या ऐतिहासिक वारसा जपत आपला स्वतंत्र असे स्थान अबाधित ठेवलेले आहे ...!

!doctype>
Post a Comment
0 Comments