Type Here to Get Search Results !

राजारामबापू हायस्कुल डीजीटल शाळा होणार ! - रावसाहेबकाका पाटील .*

*राजारामबापू हायस्कुल डीजीटल शाळा होणार ! - रावसाहेबकाका पाटील .*




आटपाडी ( प्रतिनिधी )

                आटपाडी तालुक्यातल्या पहिल्या डिजीटल शाळेचा बहुमान राजारामबापू हायस्कुल लवकरच संपादन करणार असल्याची माहीती श्री भवानी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे संघटक सचिव रावसाहेबकाका पाटील यांनी दिली .

                राजारामबापू हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेजच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने रावसाहेबकाका पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . त्यानंतर झालेल्या सांस्कृतीक कार्यक्रमात ते बोलत होते .

                 देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले . लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी अनन्वीत अन्याय अत्याचार हाल अपेष्टा तुरुंगवास भोगला . त्या सर्वांच्या प्रचंड त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य भारतीयांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्वाचे आहे . स्वातंत्र्य लढ्यासाठी जीवन समर्पित केलेल्या सर्वांना प्रथमतः अभिवादन करतो असे स्पष्ट करून रावसाहेबकाका पाटील यांनी शासनाकडून मिळालेल्या ३० लाखाच्या निधीतून राजारामबापू हायस्कुल डीजीटल शाळा होत आली . याचे टेंडरही निघाले आहे . लवकरच डीजीटल शाळेचे स्वप्नं सत्यात येत आहे . सर्वसामान्य, गरीब, उपेक्षित, वंचित, मागास, अल्पसंख्याक, बहुजनांसह सर्वांच्या साठी समर्पित असलेल्या या प्रशालेने हजारो प्रज्ञावंत, गुणवंत, संस्कारी विद्यार्थी घडविले आहेत. असे स्पष्ट केले .

                प्रत्येक क्षणाचा उपयोग करीत आधूनिक जगाच्या गतीने प्रत्येकाने वाटचाल करताना स्पर्धेच्या युगाला सामोरे जावे . प्रसंगी आपल्या प्रतिस्पर्धी सहकाऱ्याच्या सहकार्याने त्याच्यासह यशाला गवसणी घालण्याचे सध्याचे युग आहे . उचित ध्येय, कर्तव्याप्रतीची निष्ठा, चिकाटीने, परिश्रम करीत प्रचंड कष्ट आणि त्यागातून आपले इप्सित साध्य करावे . ज्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाकडून समर्पीत होण्याची भावना हवीच हवी आहे . असे उदगार आटपाडीतील प्रख्यात सर्जन प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ . सप्तेश मधुकर जाधव यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना काढले .

                करोडो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदान, त्याग, हाल, अपेष्टा, तुरुंगवास, समर्पणातून मिळालेले हे भारतीय स्वातंत्र्य *" ता कयामत तक " अर्थात सृष्टीच्या अंतापर्यत सलामत - आबाधीत राहणार आहे*. सव्वासे वर्षाच्या स्वातंत्र्य संग्रामात आहूती दिलेल्या कोट्यावधी शहीद, स्वातंत्र्यवीरांच्या अलौलीक कार्यास, त्यांच्या पवित्र स्मृतीस करोडो, सलाम, दुवाँ व्यक्त करून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष, कुरेश कॉन्फरन्स भारतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी, ९ ऑगस्ट क्रांती दिन ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, या सात दिवसांचा *स्वातंत्र्य संग्राम सप्ताह* सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकार, राज्य सरकारने करावा . अशी भावनाही सादिक खाटीक यांनी बोलून दाखविली .

                स्वागत प्रास्तावीक सुरेश कदम सर यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश ऐवळे सर यांनी केले . आभार महादेव देवकर यांनी मानले .

                यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आटपाडी तालुका युवक अध्यक्ष सुरज पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, वडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पै . लक्ष्मणभाऊ जाधव , महाराष्ट्र राज्य होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजित ऐवळे, बाळासाहेब चांडवले, दत्तात्रय लांडगे, शुभम अकॅडमीचे प्रा. तात्यासाहेब दबडे सर, महादेव आप्पा पाटील, एन. डी. पाटील सर, रमेश टकले, शिवशाहीर भोसले, आप्पासाहेब काळेबाग सर, एस एल पाटील सर, सावता माळी स्नेहजीत पोतदार, विकास देशमुख.

मुख्याध्यापक टी डी चव्हाण सर, माणिकराव साळुंखे सर, आशिष जाधव सर, दादासाहेब मोटे सर, महादेव देवकर सर, सुरेश कदम सर, मोहन सनदी सर, इर्षाद मुलानी सर, गणेश ऐवळे सर, सचिन पाटील सर, सौ . मंगल कोरवी मॅडम,  सौ. स्वाती भोसले मॅडम, कु . एस . एस . हिंगमिरे मॅडम, सौ . एस . एस चव्हाण मॅडम, सौ. एस . एस . पाटील मॅडम, अनिल जाधव , महादेव मरबळ , सुहास खंदारे , रेश्मा खंदारे, कुसुम नांगरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments