Type Here to Get Search Results !

*महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटनांच्या वतीने श्रावणबाळ वृध्दाश्रम मध्ये जीवनावश्यक साहित्य वाटप*

 *महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटनांच्या वतीने श्रावणबाळ वृध्दाश्रम मध्ये जीवनावश्यक साहित्य वाटप*





( *घोसवाड प्रतिनिधी* ) *सुनिल नाईक* 

         शिरोळ तालुक्यातील अकिवाट माळावर श्रावणबाळ वृद्धाश्रम गुरुदत्त कारखान्यासमोर सद्गुरु बाळूमामा मंदिराजवळ येथे  सोमवार  रोजी सकाळी साडेअकरा वाजता भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट चे अवचित साधून महाराष्ट्र बांधकाम कामगार असंघटित श्रमिक संघटना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव जामकर यांच्या नियोजनातून सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी आश्रमास भेट देऊन त्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक साहित्य वृद्ध लोकांच्यासाठी गोरगरीब नागरिकांच्या साठी सढळ हाताने व भरपूर मदत करण्यात आली या कार्यक्रमाला कोमल जामकर, नेहा कांबळे, वैशाली कांबळे सुरेखा चौगुले, प्रियांका चौगुले मोनिना पटेल शारदा कोरे, सुनिता सुतार, मच्छिंद्र कांबळे, कुदरत जमादार, सुनील माने श्रीधर जामकर तानाजी साळुंखे तानाजी साळुंखे अवधूत शेटे जाकीर पटेल श्रीकांत कोरे नच्चन कांबळे या सर्व नागरिकांनी आश्रमामध्ये भेट देऊन सर्व आश्रमाची विचारपूस करून आम्ही सर्वजणी सदैव तुमच्या पाठीशी राहो असे जामकर म्हणाले सर्व नागरिकांचे स्वागत आरती करून संस्थेच्या संचालिका शोभाताई पानदारे यांनी केले ,आभार मल्लाप्पा कोरे यांनी मांडले यावेळी ,शिवाजी कोळी व आश्रमातली सर्व नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments