Type Here to Get Search Results !

सामाजिक बांधिलकीचा जागर जागवत भूमीहीन गरिबांना घरासाठी जमीन देऊन स्व.अंकुश तात्या जरे यांना अनोखी आदरांजली

 सामाजिक बांधिलकीचा जागर जागवत भूमीहीन गरिबांना घरासाठी जमीन देऊन स्व.अंकुश तात्या जरे यांना अनोखी आदरांजली 

खवासपूर येथे १५ भूमीहीन कुटुंबांना घरकुलासाठी दिली मोफत जमीन 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असणाऱ्या खवासपूर ता. सांगोला येथील वसंत आप्पा जरे यांचे बंधू स्व. अंकुश तात्या जरे यांच्या प्रथम पुण्यतिथी दिवशी खवासपूर ता सांगोला येथील १५ भूमीहीन कुटुंबांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची १५ गुंठे जमीन देऊन स्वर्गीय अंकुश तात्या जरे यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. 


रविवार दि १९ एप्रिल रोजी खवसपूर ता सांगोला येथे स्वर्गीय अंकुश तात्या जरे यांना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील, सभापती पुनम इंगवले, युवा नेते ॲड दिग्विजय पाटील यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली. 


राज्य सरकारकडून सध्या ज्या गरिबांना राहण्यासाठी घर नाही त्यांना घरकुल योजना सुरू आहे. परंतु, घर बांधण्यासाठी अशा गोरगरीब लोकांना स्वतःची जमीन नसल्याने अनेकांचे घर बांधण्याची स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. खवासपूर ता सांगोला येथील अशाच १५ भूमीहीन कुटुंबांची गरज लक्षात घेऊन वसंत आप्पा जरे यांनी स्व. अंकुश तात्या जरे या आपल्या बंधूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून स्वतःच्या मालकीची १५ गुंठे जमीन गोरगरीब लोकांना देण्याचा निर्धार केला या जमिनी त्यांच्या नावावर करून या जागेवर गावातील भूमीहीन लोक आपले घर बांधणार आहेत वसंत आप्पा जरे यांच्या या अनोख्या संकल्पामुळे या कुटुंबाचे घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्याचबरोबर या १५ कुटुंबासह ज्या गोरगरीब कुटुंबांना घरकुल मंजूर झाले आहे. परंतु, त्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःच्या मालकीची जमीन नाही अशा आणखी काही कुटुंबांना आपण आपल्या मालकीची जमीन देणार असल्याचे यावेळी ज्येष्ठ नेते वसंत आप्पा जरे यांनी स्पष्ट केले.  


 वसंत आप्पा आणि स्व. अंकुश तात्या म्हणजे साक्षात राम लक्ष्मण 

आज जमिनीच्या कारणावरून सख्ख्या भावात वाद आणि भांडण झाल्याचे प्रकार आपण सर्रास पाहतो. परंतु, आपल्या भावाच्या निधनानंतर त्यांच्या प्रथम पुण्यतिथीचे औचित्य साधून आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन गरिबांना घरकुल बांधण्यासाठी देणारा वसंत आप्पा जरे यांच्यासारखा भाऊ मिळणे आज खूप मोठी गोष्ट आहे. आपण राम लक्ष्मण फक्त रामायणात वाचत किंवा ऐकत आलो आहे आज प्रत्यक्षात आपल्याला स्व अंकुश तात्या आणि वसंत आप्पांच्या रूपाने राम आणि लक्ष्मणाची जोडी पहायला मिळाली हे आपले सद्भाग्य..!

दिपकआबा साळुंखे पाटील,माजी आमदार



Post a Comment

0 Comments